निधन वार्ता : सातार्डातील माजी सैनिक अर्जुन पवार यांचे निधन

165
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.११: तालुक्यातील सातार्डा तरचावाडा येथील अर्जून उर्फ बाबू जयराम पवार वय ६५ यांचे आज मंगळवारी ११ जूनला पहाटे ४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते सैन्य दलातून निवृत्त झाले होते. त्यांचे वास्तव पुणे धानोरी येथे होते. त्यांच्या पश्यात पत्नी,मुलगा सत्यवान, मनोहर, मुलगी सौ राखी, सुना,जावई,नातवंडे दोन भाऊ, भावजयी, पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे ते काका होत.त्याच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेचार वाजता सातार्डा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.