धोकादायक विद्युत खांबामुळे संपूर्ण बाजारपेठ धोक्यात…

2

नगरपालिका, वीज वितरणने तत्काळ उपाययोजना करावी : व्यापाऱ्यांची मागणी

मालवण, ता. ११: शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यालगत असलेल्या एका विद्युत खांबास वडाच्या पारंब्यांनी वेढले आहे. या विद्युत खांबावरून वीजेच्या ठिणग्या पडत असल्याने संपूर्ण बाजारपेठेतील दुकानांना धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात व्यापार्‍यांनी सातत्याने नगरपालिका तसेच वीज वितरणचे लक्ष वेधण्यात आले. मात्र त्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने व्यापार्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्य बाजारपेठेतच हा विद्युत खांब असून वीजेच्या ठिणग्या पडून दुकांनांना आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. किनाऱ्यालगतच ही बाजारपेठ असून वादळी वाऱ्यामुळे या विद्युत खांबावरून विजेच्या ठिणग्या पडत आहे. बाजारपेठेतील सर्व लहान, मोठी दुकाने लागूनच असल्याने आग लागल्यास या सर्व दुकानांना धोका निर्माण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक विद्युत खांबांवरील झाडी हटविण्याची कामे पूर्ण करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे वीज वितरण मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे नगरपालिका, वीज वितरणने तत्काळ लक्ष देत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

2

4