बांदा वीज वितरणसमोर असनिये ग्रामस्थांचे उपोषण

314
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता११:
असनिये वायंगणवाडी येथे वीजजोडणी, थ्री फेज लाईन करून मिळण्यासाठी तसेच असनिये पंचक्रोशीतील विजेच्या समस्या दूर करण्याचा मागणीसाठी असनिये ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बांदा येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर उपोषण केले.
असनिये परिसरातील कृषी पंप जोडणीची शेकडो कामे रखडली आहेत.वायंगणवाडीत सिंगल फेज वीज जोडणीला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.शासकीय निकाशांप्रमाणे दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम एकदाही झाले नाही.कृषी पंप जोडणीची कामे रखडली असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.पालकमंत्री केसरकर यांनी डीपीडीसी मधून भरघोस निधी दिला असतानाही अधिकारी काम करत नसल्याने विजेच्या अनेक समस्या असनिये पंचक्रोशीत निर्माण झाल्या आहेत,असा आरोप संदीप सावंत यांनी यावेळी केला.जि. प.सदस्या सौ.श्वेता कोरगावकर यांनी उपोषण स्थळी भेट देत ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. सर्व समस्या तीन महिन्यात दूर करण्याचे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी संदीप सावंत,बाळकृष्ण सावंत,संतोष सावंत,दत्तप्रसाद पोकळे,मोहन सावंत,अभिमन्यू सावंत,श्रीधर सावंत,प्रथमेश सावंत,गुंडू सावंत,सिद्धेश सावंत,संदेश कोलते,सोमा सावंत,रामा पेडणेकर,दीपक गावडे,बाबली सावंत,दिगंबर सावंत तसेच असनिये वायंगणवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

\