व्यापारी उमेश पिसे लूटमार प्रकरणी पाच संशयित ताब्यात ;बेळगाव, कोल्हापूर, गोवा व सावंतवाडीतील संशयित

2

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
१३ मे २०१९ रोजी कोल्हापूर हातकणंगले येथील व्यापारी उमेश वसंतराव पिसे यांचे अपहरण करून त्यांची लूटमार केल्याप्रकरणी एकूण सहा संशयितांचा तपास घेण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील पाच सशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून गुन्ह्यात वापरलेले वाहन सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी निपाणी, इचलकरंजी व गोवा येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांत बेळगाव मधील दोन, कोल्हापूर व गोवा येथील एक-एक असून सावंतवाडी येथील एका सशयिताचा समावेश आहे. सहावा संशयित निष्पन्न झाला असून लवकरच त्याला सुद्धा जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. यासाठी अपर पोलीस निरीक्षक निमित गोयल, सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे गेडाम यांनी यावेळी सांगितले.

4