मालवण, ता. ११ : येथील रॉकगार्डननजीकच्या खडकाळ भागात समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या एका प्रेमी युगुलास आपला जीव धोक्यात घालत पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांनी वाचविल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नसती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
दरम्यान युवती व तिचा प्रियकर हे दोघेजण बांदा येथून मालवण येथे पर्यटनासाठी आले होते.
बांदा येथील युवती व तिचा प्रियकर रॉकगार्डन परिसरातील खडकाळ भागात समुद्री लाटांचा आस्वाद घेत होती. त्याचवेळी अचानक लाटांचा जोर वाढल्याने खडकाळ भागात लाटांचा तडाखा बसू लागला. लाटांच्या तडाख्यात दोन पर्यटक अडकल्याची माहिती स्थानिक मच्छीमाराने पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ हवालदार सुभाष शिवगण व पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर, महिला पोलिस कर्मचारी प्रतिभा जाधव, प्रविणा आचरेकर यांनी रॉकगार्डनच्या खडकाळ भागात धाव घेतली. युवती व युवक खडकात लाटांनी वेढलेल्या स्थितीत अडकून पडल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी चिपकर यांनी जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून दोघांनाही धीर दिला. त्यानंतर युवक लाटांचा सामना करत सुरक्षित ठिकाणी आला. मात्र खडकाळ भागाला चारही बाजूनी लाटांनी वेढल्याने युवतीला सुरक्षित बाहेर काढणे जिकरीचे बनले होते. तरी देखील चिपकर यांनी त्या युवतीला मार्गदर्शक सूचना करत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. दोघांना जीवदान देत देवदूत बनलेल्या सिद्धेश चिपकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धेश चिपकर बनले ‘देवदूत’… प्रेमी युगुलाला दिले जीवदान : रॉकगार्डन येथील घटना…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES