खंडित वीजपुरवठा प्रश्नी मालवण वीज वितरणचे अधिकारी धारेवर…

2

मेढा-राजकोटातील नागरिक आक्रमक : वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा…

मालवण, ता. ११ : मेढा व राजकोट येथील वीजपुरवठा गेले सात दिवस खंडित असल्याने येथील नागरिकांनी वीज वितरणचे अभियंता श्री. भुजबळ यांना आज सायंकाळी धारेवर धरत जाब विचारला. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
यावेळी सहदेव बापर्डेकर, मनोज पराडकर, भाऊ केळुसकर, राजू गिरकर तसेच मेढा व राजकोट येथील नागरिक उपस्थित होते. मेढा राजकोट परिसरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. शिवाय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने येथील नागरिक, हॉटेल व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

4

4