वेंगुर्लेत पावसाची रिमझीम सुरुवात : समुद्र खवळला

2

वेंगुर्ले : ता.११

वेंगुर्ले तालुक्याच्या किनारपट्टी भागात सोमवारी संध्याकाळपासून सोसाट्याचा वारा वहायला सुरुवात झाली असून समुद्र खवळला आहे. वेंगुर्ला बंदर याठिकाणी मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला येऊन धडकत आहेत. समुद्रातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आज सायंकाळी रिझमिझ स्वरुपात पावसानेही हजेरी लावली.
अलिकडे वातावरणात पावसाळी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. सोमवारी सायंकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली. समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन समुद्रही खवळला आहे. मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. आज सायंकाळी शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. दरम्यान,वीजेचाही लपंडाव होत आहे.

1

4