मालवण, ता. ११ : सोसाट्याच्या वाऱ्यासह खवळलेल्या समुद्राचा जोरदार तडाखा आज देवबाग गावाला बसला. यात ख्रिश्चनवाडीतील दोन घरांना पाण्याने वेढा घातला. देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली तेथिल शवदाहिनीही वाहून गेली आहे. यात आनंद कुमठेकर यांची होडी लाटांच्या तडाख्यात सापडल्याने त्यांचे नुकसान झाले.
सोसाट्याच्या वाऱ्याचा जोर आज आणखीनच वाढला. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली होती. याचा मोठा फटका देवबाग गावास बसला. ख्रिश्चनवाडीतील दोन घरांना समुद्राच्या पाण्याने वेढा घातला होता तर काही घरांमध्ये लाटांचे पाणी घुसले होते. संगम येथील जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला. यात शवदाहिनीही समुद्रात वाहून गेली. समुद्राच्या पाण्याने वेढा घातल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, मनोज खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्य फिलसू फर्नांडिस, निहीता गावकर, नागेश चोपडेकर, रमेश कद्रेकर, जॅक्सन फर्नांडिस, आंनद तारी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.
समुद्री लाटांचा देवबागला तडाखा… ख्रिश्चन वाडीतील काही घरांमध्ये पाणी घुसले : ग्रामस्थांमध्ये घबराट…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES