वेंगुर्ले उभादांडा येथे भुसारी दुकानाला आग..लाखो रुपयांचे नुकसान…

572
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला, ता. १२: वेंगुर्ले उभादांडा गणपती मंदिर नजिक आडारी येथील उदय शिरोडकर यांचे भुसारी दुकानाला पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत दुकानासह असलेला भुसारी माल जळून राख झाला असल्याने त्यांचे सुमारे दिड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
दोन दिवसांपूर्वीच दुकानाचे दुरुस्तीचे काम करून कल सर्व सामान भरून नव्या उमेदीने शिरोडकर यांनी दुकान सुरू केले होते. नेहमी प्रमाणे शिरोडकर काल संध्याकाळी आपले दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान मध्यरात्री या दुकानाला अचानक आग लागली. आग दुकानातील तेलाच्या पिशव्या, कॅंन यामुळे भडकली. मात्र तेथे कोणीच आजूबाजूला नसल्याने दुकान पूर्ण आगीच्या भक्षस्तानी पडले. पहाटे शेजारी राहणारे वेंगुर्लेकर याना दुकानातून धूर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तात्काळ पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच या दुर्घटने बाबत शिरोडकर यांना माहिती दिली.
दुकानाला आग लागल्याचे समजताच शिरोडकर तात्काळ दुकानाकडे धावून आले. मात्र तो पर्यंत दुकान पूर्ण जळून गेले होते. दरम्यान तलाठी मिनल सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व पंचनामा केला. यावेळी सभापती सुनिल मोरजकर, उपसरपंच गणपत केळूकर,हितेश धुरी,पो.पा. विजय नार्वेकर, कोतवाल संजय नार्वेकर यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या नंतर भाजपचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई यांनी तेथे भेट देऊन शिरोडकर यांना पक्षातर्फे तातपुरती स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत केली. यावेळी उपस्थित उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर , शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , मच्छिमारनेते दादा केळुसकर , ग्रा. पं.सदस्य शिवाजी पडवळ व दयानंद खर्डे , बुथप्रमुख प्रकाश मोटे , बुथप्रमुख आनंद मेस्त्री , बुथप्रमुख हेमंत आडारकर , माजी सरपंच शामसुंदर मुननकर , आंबा बागायतदार नंदकीशोर पेडणेकर , अन्नपुर्णा तांडेल , राधाकृष्ण पेडणेकर ,विष्णू परब , गणेश आजगावकर , अजय साळगांवकर , रुपेश आडारकर , बाळु आरावंदेकर ,विवेक आडारकर , राजन साळगांवकर , विठ्ठल खराडे , बाबुराव साळगांवकर , तानाजी उपसकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
_____________________________
? _*चार्वी ब्युटी पार्लर अँड स्पा*_??
अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज

??‍♀ *आमच्या सेवा :* ??
▪ लेटेस्ट हेअर कट ▪ब्युटी मसाज▪पेडीक्युअर,मेनिक्युअर मसाज मशीनसह▪ फेशिअल▪आयब्रोज▪वॅक्सिंग, हेअर स्पा▪ पॅकेजीस-पार्टी पॅकेज▪ ब्रायडल पॅकेज▪ रीलक्शेशन पॅकेज (मसाज आणि फेशिअल)
▪ इतर अत्याधुनिक सेवा उपलब्ध

? *ओपनिंग स्पेशल ऑफर*
*फुल बॉडी स्पा फक्त रु.९९९/-*

✌ब्युटीशन कोर्स सर्टिफिकेटसह✌

*पत्ता :* पर्यटन स्वागत केंद्र, गाळा नं.१०, एसपीके कॉलेजसमोर, सावंतवाडी.

*फॉर अपॉइंटमेंट…*
*7719941952*
_____________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A