वायंगवडे सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

1028
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १२ : तालुक्यातील वायंगवडे गावात शिवसेना पक्षाने स्वाभिमान पक्षाला दणका दिला आहे. स्वाभिमान पक्षाचे वायंगवडे सरपंच आनंद सावंत, उपसरपंच सत्यवान आंगणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. ओरोस येथे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी शिवबंधन बांधून तसेच पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी वायंगवडे गावातील सागर परब, सचिन सुद्रिक, अमोल सुद्रिक, संतोष जाधव, प्रशांत परब, बाबा परब, रुपेश परब, रामचंद्र परुळेकर यासह इतर ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. वायंगवडे गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील. तसेच प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर, खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, प्रसाद मोरजकर, आशिष परब, डॉ. बबन सावंत आदी उपस्थित होते.