मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मालवणातील प्रमुख तीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी

163
2
Google search engine
Google search engine

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश ; पावसाळ्यानंतर कामे लागणार मार्गी

मालवण, ता. १२ : खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील तीन रस्त्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये वायंगणी बौद्धवाडी ते सापळेबाग तोंडवली रस्त्यासाठी ५ कोटी १४ लाख रुपये, विरण मालोंड रस्त्यासाठी ३ कोटी ९ लाख रुपये, एमएसएच ०४ ते आचरा गणपती मंदिर रामेश्वर मंदिर डोंगरेवाडी रस्ता, पारवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर हि कामे मार्गी लागणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
या तीनही रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. वाहनचालकांना कसरत करत या मार्गावरून वाहने चालवावी लागत असल्याने वाहतुकीस हे मार्ग सोयीस्कर नव्हते. रस्ते दुरुस्तीच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून वारंवार शासनस्तरावर पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१९-२० या वित्तीय वर्षात बॅच २ अंतर्गत या रस्त्यांच्या कामाची मंजुरी मिळवली आहे.
वायंगणी बौद्धवाडी ते सापळेबाग तोंडवली रस्ता ५.४८५ कि.मी, विरण मालोंड रस्ता ४.१००कि.मी, एमएसएच ०४ ते आचरा गणपती मंदिर रामेश्वर मंदिर डोंगरेवाडी रस्ता, पारवाडी रस्ता ३.६३ कि.मी लांबीच्या कामाची मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडून पाठपुरावा सुरु होता. त्याला अखेर यश आले आहे. या रस्त्यांच्या मजबुतीकरण व नूतनीकरणामुळे वाहनचालक प्रवाशांना होणार त्रास दूर होणार आहे