तुळस शिवसेना जि.प. मतदार संघ महिला विभाग संघटक पदी अनन्या धावडे यांची निवड

172
2

 

वेंगुर्ले, ता.१३ : तालुक्यातील तुळस शिवसेना जि.प. मतदार संघ महिला विभाग संघटक पदी तुळस येथील सौ.अनन्या आशिष धावडे यांची निवड करण्यात आली आहे.
वेंगुर्ले येथील शिवसेना शाखेत महिला तालुका संघटक सुकन्या नारसुले यांच्या हस्ते निवडीचे पत्र धावडे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळा दळवी तसेच आबा कोंडस्कर, पंकज शिरसाट, संदेश निकम, संजय गावडे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

4