….अन्यथा वीज अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही

2

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विज वितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा…

सावंतवाडी, ता. १३: पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील वीज नसता कोलमडून गेली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील कंपनीचे अधिकारी भालचंद्र कुलकर्णी यांना घेराव घातला. वारंवार होणाऱ्या समस्या दूर करा अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आला.
यावेळी नगरसेवक राजू बेग,सुधीर आडिवरेकर,उदय नाईक,अतुल पेंढारकर,दिलीप भालेकर,महेश बांदेकर,गणेश पडते,नॅल्सन फर्नाडीस,बंड्या आरोलकर,गोट्या वाडकर,महेश पांचाळ,नागेश जगताप,अश्वेक सावंत, अभी महाले, गुरु मठकर आदी उपस्थित होते.

4