दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते मालवण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

2

सिंधुदुर्गनगरी, ता. १३ : आज ओरोस येथे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते मालवण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी सिद्धेश चिपकर यांच्यासह हवालदार सुभाष शिवगण, प्रतिभा जाधव व प्रविणा आचरेकर यांनी आपला जीव धोक्यात घालून अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या बांदा येथील प्रेमीयुगुलाला जीवदान दिले होते. मालवण पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल पोलिस अधीक्षकांनी घेत चौघाही कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

3

4