मदत कार्यात धावून येणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या पोलिस पाठीशी

2

स.पो.नि. बाकारे; सह्याद्री जीव रक्षक करुळ सेवाभावी संस्थेची स्थापना

वैभववाडी, ता. १३ : नैसर्गिक आपत्तीत एखाद्याचा जीव वाचविणे हे फार मोठे पुण्याईचे काम आहे. प्रशासन कायम या तरुणांच्या सोबत राहील. असे प्रतिपादन वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले.
नैसर्गिक आपत्ती व घाट मार्गात होणारे अपघात यांना तातडीची मतद व्हावी या हेतूने करुळ येथे सह्याद्री जीव रक्षक करुळ या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे उदघाटन पो. नि. श्री बाकारे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी करुळ सरपंच सरिता कदम, नायब तहसिलदार गमन गावित, सा.बां.चे कनिष्ठ अभियंता निलेश सुतार, माजी सरपंच हिंदुराव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा कदम, रमेश पांचाळ, रविंद्र पवार, सह्याद्री जीव रक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील, राजू जामसंडेकर, मनिषा राऊत, बबन डकरे, विद्याधर सावंत, मोतीराम वारंग, महेश कदम, दिपक लाड, पो.पा. प्रताप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री बाकारे म्हणाले, या संस्थेतील युवकांचे अपघात घटनेवेळी पोलीस प्रशासनाला कायम सहकार्य लाभले आहे. जिल्हा आपत्ती यंत्रणेकडून या संस्थेला निधी अथवा यंत्रसामुग्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, समाजातील दानशूर व्यक्तींनीही अशा संस्थांच्या पाठीशी राहीली पाहिजे. करुळ घाटरस्ता निर्मितीत गावच्या ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. याच गावात सेवाभावी संस्था सुरू होतेय याचा प्रशासनाला आनंद आहे. प्रशासन कायम या तरुणांच्या सोबत असेल असे सांगितले. यावेळी गमन गावित, बाळा कदम, हिंदुराव पाटील, राजू जामसंडेकर, नरेंद्र कोलते, रविंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सह्याद्री रक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी संस्थेची पुढील रूपरेषा विशद केली. या संस्थेत 30 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमप्रसंगी सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ सगरे यांनी तर आभार ग्रामसेवक शशिकांत गुरव यांनी मानले.

2

4