भात पेरणी खोळंबली; भुईबावडा, करूळ घाट सुरक्षित
वैभववाडी :वैभववाडी तालुक्यात गुरूवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल दोन तास कोसळणा-या पावसाने बळीराजाला सुखद धक्का दिला आहे. मात्र या पावसाने भुईबावडा व करुळ घाट सुरक्षित आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. मात्र कुठेही वित्तहानी झाली नसल्याची नोंद उशिरापर्यंत नव्हती.
गेले दोन दिवस उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. अंगातून घाम ओसंडून वाहत होता. गुरुवारी संध्याकाळी ३. वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गेले काही दिवस वाढलेली उष्णता या पावसाने कमी झाली असून हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. मात्र या जोरदार पावसाने भुईबावडा व करुळ घाट सायंकाळी उशिरापर्यंत सुरक्षित होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.