तळकट येथे झाड पडून घर जमीनदोस्त

235
2

दोडामार्ग प्रतिनिधी 
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने दोडामार्ग तालुक्यात दाणादण उडविली. तळकट येथील शैलेजा पवार यांच्या घरावर झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. गुरुवारी दुपारी 2.30 वा च्या.  दरम्यान ही दुर्घटना घडली. या वेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्यात पवार यांचा संसार उघड्यावर पडला. या पावसामुळे बुधवारी ठिकाणी विद्युत वाहिन्या सुटल्याने संपूर्ण रात्र तालुका वासियांना अंधारात काढावी लागली. गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत विजेची बत्ती गुल होती.

4