वैभववाडी बसस्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य

159
2

वैभववाडी/पंकज मोरे, ता. १३ : वैभववाडी येथे नव्याने सुरु झालेल्या बसस्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जनतेमधून केली जात होती. मात्र याकडे एस.टी. महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. मात्र याठिकाणी अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असाही सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
गेली अनेक वर्षे सुसज्ज बसस्थानक व्हावे. अशी मागणी प्रवाशांमधून होत होती. अखेर जानेवारी दरम्यान बसस्थानक एस.टी.महामंडळाने अल्पबचत भवनामध्ये आवश्यक ते फेरफार करून तेथे नियंत्रण कक्ष सुरू करून बसस्थानकाचे कामकाज सुरू करण्यात आले. परंतु बसस्थानक परिसरात डांबरीकरण नसल्याने प्रवाशांना चिखलाशी सामना करावा लागणार आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने बसस्थानक परिसर अक्षरशः जलमय झाले आहे. या ठिकाणी घसरून पडण्याची दाट संभवना आहे. दलदल झाल्याने प्रवाशांना याठिकाणी उभेही राहता येत नाही आहे. वेळीच बसस्थानक परिसरात एस.टी. महामंडळाने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांमाधून केली जात आहे.

4