करुळ घाटात दरड कोसळली

2

पहिल्याच पावसात घाटाला ग्रहण;पावसाची रिपरिप सुरूच

वैभववाडी/प्रतिनिधी

वैभववाडी तालुक्याला गुरुवारी सकाळपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढला. या पावसाने भुईबावडा व करुळ घाटात रस्त्यावर दरडींची किरकोळ पडझड सुरु होती. करुळ घाटात चार पाच ठिकाणी दगडी रस्त्यावर आल्या होत्या. वाहनचालकांनी रस्त्यावर आलेले दगड बाजूला केले. मात्र दोन्हीही घाटमार्गातून दिवसभर सुरळीत वाहतूक सुरु होती.
गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या तयारीला लागला आहे. तर दिवसभर अधूनमधून विजेचा लपंडाव सुरु झाला होता. गेले दोन दिवस विजेच्या लपंडावाने नागरीक हैराण झाले आहेत. गुरूवारी सायंकाळी करूळ घाटात दगडी रस्त्यावर आल्या आहेत. वाहनचालकांनी दगड बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली. मात्र उशिरापर्यंत दोन्हीही घाटातील वाहतूक सुरळीत आहे.

4