आंबोलीच्या मदतीसाठी पोलीस कर्मचारी धावले….

269
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दरड हाताने केली बाजूला : बांधकाम विभाग मात्र सुशेगात

आंबोली, ता. 13 : येथील घाटात कोसळलेली दरड दूर करण्यासाठी ग्रामस्थांकडून वारंवार सूचना देऊन सुद्धा बांधकाम विभागाचे अधिका-यांनी त्या ठिकाणी पाठ फिरवली.
अखेर आंबोली पोलिस स्टेशनचे हवालदार गुरुदास तेली यांनी आपल्या सहकार्‍यांसह प्रवाशांच्या मदतीने हा दरडीचा भाग हाताने ढकलून रस्ता सुरळीत केला. सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणी दरडी चा काही भाग कोसळत असून पुन्हा त्या ठिकाणी दगड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.या सर्व प्रकाराबाबत आंबोली ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकामच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात तसेच वेळ काढून भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. तर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

\