आंबोलीतील ते स्टाॅल पुन्हा उभारणार…..

312
2

आंबोली धबधब्यावर स्टॉल उभ्या करणाऱ्या त्या व्यावसायिकांचा प्रश्न अखेर सुटला आहे तात्पुरते स्टॉल उभे करण्यास हरकत नाही असा हिरवा कंदील खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यामुळे ते आता स्टॉल पुन्हा उघडण्यात येणार आहेत याबाबत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी शिष्टाई करत स्टॉलधारकांना प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली आज स्टॉलधारकांनी शिवसेना व भाजपा च्या मदतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली यावेळी आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही तर आमचा व्यवसाय हिरावण्याचा तुम्हाला अधिकार नाही असा इशारा त्यावेळी त्या व्यवसायाकडून देण्यात आला अखेर श्री तेली यांनी थेट मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून उभारण्यासंदर्भात हिरवा कंदील घेतला त्यामुळे आता पुन्हा एकदा वीस व्यवसायिकांची स्टॉल त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आंबोली देवसू चौकुळ या तीन समित्यात वाद असल्यामुळे हे स्टॉल आपण तोडून टाकल्याची कबुली यावेळी समाधान चव्हाण यांनी दिली यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष महेश सारंग शिवसेनेचे रुपेश राऊळ शब्बीर मणियार राघोजी सावंत आदींसह स्टॉलधारक यावेळी विजय सावंत,विश्वास सावंत,आनंद गावडे,दशरथ गावडे,कृष्णा गावडे,विलास परब,विजय गावडे,भैरू पाटील,सत्यवान गावडे,लक्ष्मण पाटील,तुकाराम गावडे,पांडुरंग गावडे,विलास गावडे,सुनील गावडे,सुरेश गावडे,विठ्ठल गावडे,वसंत गावडे,संतोष परब,केशव जाधव,देऊ पाटील आदी उपस्थित होते.

4