ओरोस येथे घरावर झाड कोसळले

2

सिंधुदुर्गनगरी ता,१४:  ओरोस महापुरूष मंदिर येथील जयश्री परब यांच्या राहत्या घरावर पिंपळाचे अवाढव्य झाड कोसळले. यात जयश्री परब यांनी दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना काल (ता.१३) रात्री उशिरा घडली.
तालुक्‍यात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. यातच सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका ओरोस महापुरूष मंदिर येथील जयश्री परब यांना बसला. काल रात्री उशिरा झालेल्या वादळी पावसात त्यांच्या राहत्या घरावर पिंपळाचे अवाढव्य झाड कोसळले. घराचे पूर्णपणे नुकसान झाले. अचानक घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने घरातील माणसे घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली.
भला मोठा पिंपळ घरावर कोसळल्याने ते घाबरले. प्रशांत परब आणि त्याची आई जयश्री परब घरात राहत होती. प्रशांतच्या आईला यात दुखापत झाल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात घराचे मात्र पुर्णतः नुकसान झाले. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. पावसाळ्यात पिंपळ कोसळला असल्याने त्यांचे रहाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

3

4