जि. प.सदस्य प्रितेश राऊळ यांचे अधिकाऱ्यांना निवेदन
वेंगुर्ले, ता.१४ : रेडी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे तरी सदर खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जि.प. सदस्य प्रितेश राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गाव खनिजाबरोबरच द्विभुज गणपतीमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावात नेहमी पर्यटकांची ये-जा असते, मात्र गावातील रस्ता खड्डेमय बनला आहे. संपुर्ण १२०० मी लांबीच्या या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाला तीन महिन्यापुर्वी मंजुरी मिळाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे लक्ष दिले नाही. सध्या पावसाळा सुरु झाल्याने आणखीन चार महिने रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ शकत नाही. या सर्व कारभारास संबंधीत विभाग जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी काम वेळेत का सुरु केले नाही याचा लेखी खुलासा रेडी ग्रामपंचायतीकडे करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना देताना त्यांच्या सोबत रेडी गावचे सरपंच रामसिंग राणे तसेच पुरुषोत्तम राणे, स्नेहल राऊळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.