सावंतवाडी शहरात अडीच हजार वृक्ष लावणार ;बबन साळगावकर…पालिकेकडून खासकीलवाडा भागात वृक्षारोपण…

2

सावंतवाडी, ता. १५ : शहरात यावर्षी अडीच हजार रुपये लागवडीचे उद्दिष्ट ठेवून सावंतवाडी पालिका काम करणार आहे. यात विविध वृक्षांचा समावेश असणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.
येथील पालिका पदाधिकार्‍यांच्या वतीने आज येथील खासकीलवाडा सिमीत्री येथिल उदयान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,नगरसेवक उदय नाईक, परिमल नाईक, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, साक्षी कुडतरकर, राजू तावडे, कीर्ती बोंद्रे ,लक्ष्मण करंबळेकर, रामनाथ सावंत, अमोल दळवी, मिलिंद लोंढे, प्रसाद दळवी, हरिहर वाटवे,प्रज्योत नाईक, आनंद साळसकर, गौरव गवस, आदेश कुडतरकर आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी पालिकेच्यावतीने मोहमणी या झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी साळगावकर पुढे म्हणाले दरवर्षी पालिकेच्या वतीने झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.यावर्षीसुद्धा दालचिनी, कोकम, जांभूळ ,वेलवेट एप्पल अशा प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत याचा फायदा भविष्यात सावंतवाडीकरांना होणार आहे.यावेळी पालिकेचे कर्मचारी गजानन परब वैभव सांगेलकर, दत्ताराम कुंडेकर, फ्रान्सिस डिसोझा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी परिसरातील उद्यानाला संरक्षक कठडा उभारण्यात यावा रस्त्यावरचे पाणी उद्यानात जात आहे त्यामुळे तात्काळ याबाबत अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.

4