सावंतवाडी ता.१५: येथील “द सेवियर’ शाखा आणि “पंचक्रोशी मित्रपरिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मळगाव मेट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भेट देऊन पालिकेच्या वतीने या मोहिमेस सहकार्य केले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य झाले होते.यात प्लास्टिक पिशव्या,केबल्स, दारूच्या बाटल्या आदी कचऱ्याचा समावेश होता.त्यामुळे येथील परिसरात पाऊस पडताच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.तर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निसर्गरम्य असलेला हा परिसर अस्वच्छ झाल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते.यावर मात करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.यावेळी येथील नागरिकांनीच हा परिसर स्वच्छ ठेवण्या संदर्भात तसेच उद्या दिनांक १६ जून रोजी सकाळी ७:३० वा. येथील नरेंद्र डोंगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बीजारोपण व वृक्षारोपण मोहिमेस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी सागर नाणोसकर,चिन्मयी नाईक,अपूर्वा नाईक,अजित सावंत,ओंकार सावंत,सोमेश्वर सावंत,हनुमंत पेडणेकर,रोहित निर्घृण,महेश शिरोडकर,राजन कालवणकर,प्रणिता कोटकर,रवींद्र धाऊसकर,अंकुश आजगावकर,सारिका पुनाळेकर,सावंतवाडी वनविभागाच्या वनरक्षक चंद्रिका लोहार,वनपाल प्रमोद राणे आदींनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
सावंतवाडीत मळगाव मेट परिसरात स्वच्छता मोहीम…”द सेवियर’ आणि “पंचकोशी मित्रपरिवार’ यांचे आयोजन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES