बांदा येथे १० लाखाची दारू जप्त

2

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुंबई – गोवा महामार्गावरील बांदा कट्टा येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई केली. या कारवाईत ९ लाख ९६ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. वाहनचालक एकनाथ जयबल व रमराव जयभल रा. बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक फडनीस तसेच एस.जी.खांडारे, कोयंडे, धुरी, अनुपम खंडे, वालावलकर, राऊत, सरमळकर या पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ट्रक सह १७ लाख ९६ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात महाराष्ट्र दारू बंदी अधियानियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7

4