मंगेश तळवणेकरांचा संकल्प अखेर पूर्ण

248
2

 

 

सावंतवाडी, ता. १५ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला चाऱ्याच्या गाड्या पाठवून सावंतवाडीतील माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळेकर यांनी आपला संकल्प अखेर पूर्ण केला. यात त्यांनी तब्बल दहा गाड्या पाठविल्या.
शेवटची दहावी गाडी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत व ठेकेदार के. सी. शिवाण्णा यांच्या मदतीने पाठवली. त्यांच्या संकल्पाचा फायदा दुष्काळग्रस्त भागासाठी झाला आहे.
राज्यात दुष्काळ पडलेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुष्काळी भागासाठी दहा गाड्या चारा पाठवण्याचा संकल्प श्री. तळवणेकर यांनी केला होता. त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकदा त्याने पुढाकार घेत चारा पाठवण्यासाठी मदत केली. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा झाला. आज शेवटची गाडी पाठवण्यात आली. यावेळी बाबा गोसावी, विजय राऊत, उमेश नाईक, बाळा नाईक, संतोष नाईक आदी उपस्थित होते.

4