कणकवली नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडवर रोप लागवड

132
2
Google search engine
Google search engine
Google search engine

युरेका सायन्स क्लबच्या मुलांचा उपक्रम

कणकवली, ता.15 : महामार्ग चौपदरीकरणात हजारो वृक्षांची तोड झाली. त्या बदल्यात शासकीय पातळीवर अद्याप नवीन रोप लागवड झालेली नाही. मात्र युरेका सायन्स क्लबच्या माध्यमातून आज 100 रोपांची लागवड नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडवर करण्यात आली. तसेच यापुढील काळातही मोकळ्या क्षेत्रावर रोप लागवड केली जाणार असल्याची माहिती युरेका सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दिली.
महामार्ग चौपदरीकरणात झालेली वृक्षहानी भरून काढण्याचा संकल्प कणकवलीतील युरेका सायन्स क्लबच्या मुलांनी केला होता. त्यानुसार आज क्लबच्या अध्यक्षा सुषमा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत डंपिंग ग्राउंडवर वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी केला. तर रोप लागवडीमध्ये युरेकाच्या 26 मुलांनीही सहभाग घेतला. या मुलांना वड, चाफा, जांभूळ, पिंपळ काजू आदी रोपांची उपलब्धता हिरण्यमयी आणि सारा मोरजकर यांच्याकडून देण्यात आली होती. या उपक्रमावेळी राखी अरदकर, शीतल वाळके, बाळू मेस्त्री, श्रीमती करंदीकर, विजय शेट्टी, सुषमा केणी आदी उपस्थित होते.

\