मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा….

270
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आंबोलीतले स्टॉल पुन्हा उभारले :  शिवसेना-भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे मानले आभार

आंबोली / अमोल टेंबकर, ता. १५ : येथील धबधबा परिसरातील वनविभागाकडून तोडण्यात आलेले ‘ते’ स्टॉल आज अखेर पुन्हा उभारण्यात आले. यावेळी ‘मोडुन पडला संसार पण मोडला नाही कणा’ या कवितेचा प्रत्यय त्या स्टाॅलधारकांनी समाजाला दाखवून दिला.
दरम्यान उद्यापासून वर्षा पर्यटनासाठी या ठीकाणी येणा-या पर्यटकांना सेवा देणार आहेत, असे तेथिल स्टाॅलधारकांनी सांगितले. वनविभागाने आंबोली देवसू व चौकुळ या ग्रामस्थात एकमत नसल्याचे कारण पुढे करून मंगळवारी रातोरात 20 हून अधिक स्टाॅल तोडून टाकले होते. त्यामुळे या सर्व स्टॉलधारकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ते  स्टॉल पुन्हा उभारण्यात यावेत अशी मागणी या स्टॉलधारकांकडून करण्यात आली होती. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली व तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली हे स्टॉल पुन्हा उभारण्यात यावे या मागणीसाठी तेथील स्टॉलधारकांनी काल वन विभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. दरम्यान यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे थेट चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय झाला. त्यानंतर खुद्द मुनगंटीवार यांनी हे स्टॉल उभारण्यास हिरवा कंदील दिला होता.
त्यानुसार आज तेथील व्यवसायिकांनी पुन्हा एकदा स्टॉल उभारले. आज सायंकाळी उशिरापर्यंत स्टॉल उभारण्याचे काम सुरू होते. दरम्यान उद्यापासून वर्षा पर्यटन सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत असे स्टाॅल धारकांकडून सांगण्यात आले. यावेळी स्टॉल धारकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणाऱ्या राजन तेली यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. सारंग, शिवसेनेचे रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, राघोजी सावंत व वनविभागाचे अधिकारी आदींचे स्टॉलधारकांनी आभार मानले.
\