विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाचे जि.प .समोर धरणे आंदोलन

2

सिंधुदुर्गनगरी ता.१५:शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकिंचे दरमहा मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, थकित मानधन आणि एप्रिप पासून मंजूर झालेले वाढीव मानधन त्वरित द्यावे यासह आपल्या विविध मागण्यांसाठी सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्यावतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
मानधन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.. वाढीव मानधन त्वरित दया… हमारी ताकद हमारी यूनियन.. हम सब एक है… ऐ शासको होश में आव होश में आकर बात करो.. आदि विविध गगणभेदी घोषणा देत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे जिप प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी सामाजिक शालेय पोषण आहार संघाच्या वतीने आज जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कमल परुळेकर, उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत यांच्यासह जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देणाऱ्या अनेक स्वयंपाकी महिला उपस्थित होत्या. याबाबतचे निवेदन जिप मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आले.
शालेय पोषण आहाराबाबत स्वयंपाकीना मानधन वेळेवर मिळत नाही. याबाबत शिक्षण विभागात चौकशी केली असता स्वयंपाकीच्या मानधनावर शिक्षण विभाग वित्त विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सह्या करण्यास वेळ नसल्याने स्पष्ट करण्यात येते. त्यामुळे स्वयंपाकी महिलांना तीन-तीन महिने मानधन मिळत नाही असा आरोपही कमल परुळेकर यांनी केला आहे. तसेच शाळांना सुट्ट्या पडल्याने पाठविले मानधन शिक्षक सुट्टीवर गेल्यामुळे वाटप झालेले नाही व मार्चचे भाजीपाला इंधन अनुदान अजून स्वयंपाकीना मिळालेले नाही. काही वेळा मानधन शाळांकडे पोहोचते मात्र शिक्षक ते वेळेवर काढून देत नाहीत. याबाबत विचारणा केल्यावर मानधन मिळते मात्र शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा रोष सहन करावा लागतो. यासह अन्य मागण्यांकडे जिप प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी आज सामाजिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्यावतीने जिपसमोर धरणे आंदोलन केले.

5

4