विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा अशीच कायम ठेवावी : प्रज्ञा परब

2

वेंगुर्लेत जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार

वेंगुर्ले, ता. १५ : विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा अशीच कायम ठेवून स्वत: बरोबर कुटुंबाचे व गावाचे नाव रोशन करावे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शाब्बासकीची मिळालेली ही थाप लक्षात ठेऊन यापुढेही खुप प्रगती करा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ले तालुका वसुली आढावा समितीतर्फे तालुक्यात दहावी-बारावी परिक्षेत उतीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा भेटवस्तूं व प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तालुक्यातील दहावीमध्ये यश मिळविलेल्या श्रावणी संजय बागायतकर, वैष्णवी शिवराम वराडकर, फाल्गुनी विद्याधर प्रभु, निकीता संजिवन तुळसकर, तेजस संजिव मोचेमाडकर तर बारावी मध्ये रिया दत्ताराम आंबेरकर, मधुर राजन कोठारी व प्रथमेश बुधाजी पेडणेकर या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुले तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे, जिल्हा बँक संचालक राजन गावडे, बँकेचे अधिकारी भागेश बागायतकर, दत्तात्रय प्रभुआजगावकर, विवेकानंद बागलकर, नंदकुमार रेडकर तसेच विद्याधर प्रभु, संजय बागायतकर, शिवराम उर्फ गुरु वराडकर यांच्यासह पालक उपस्थित होते.

5

4