विजेचा शॉक बसल्याने तरुणाचा मृत्यू…

2
मालवण, ता. १५ : घरगुती उपकरणाची दुरुस्ती करत असत विजेचा शॉक बसल्याने तुकाराम रामचंद्र पाताडे (वय-४०, रा. न्हिवे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. कुटुंबीयांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यास दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे श्री. पाताडे हे बरीच वर्षे कामास होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे न्हिवे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात प
4