कृषी महाविद्यालय सांगुळवाडच्या कृषीदुतांचे मांगवलीमध्ये आगमन

2
वैभववाडी, ता. १५ : कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषिदूत प्रशिक्षणासाठी मांगवली येथे दाखल झाले. मांगवली ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे शेतीमित्र श्री. महेश संसारे यांनी त्यांचे स्वागत केले. हे कृषिदूत शेती विषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान, कृषी जनजागृती करणे तसेच कार्यानुभव यांचा अभ्यास करणार आहेत. सहा महिने हा अभ्यासक्रम चालणार आहे.
यावेळी कृषिदूतांनी विविध उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी मधुकर लिंगायत,  विलास कदम, गणेश राणे, गणेश कांबळे, वसंत राणे, संतोष गुरव आदी ग्रामस्थ तर कृषिदूत शुभम खैरे, सनी गव्हाणे, महेश खंडागळे, निरंजन धायगुडे, दीपक कुंभार, राजेंद्र धुरूपे, गौरव धाणके, अवधूत कदम, निखिल गायकवाड, जी.हरीश, के .साईकृष्णा हे उपस्थित होते. या उपक्रमांची प्राचार्य डॉ.एस.आर.उघडे,रावी इंनचार्ज व्ही.डि.कदम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे
4