खांबाळे टेंबवाडी येथील रेल्वे ट्रॕकवर तरूणाचा मृतदेह आढळला

2

खांबाळे मोहितेवाडी येथील घटना

वैभववाडी, ता. १५ : खांबाळे मोहितेवाडी येथील अविवाहित तरूणाचा येथील टेंबवाडी रेल्वे ब्रीजवर शनिवारी सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. एकनाथ रघुनाथ कर्पे वय ४६ वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याने आजारपणाला कंटाळून ट्रेनखाली झोकून देत आत्महत्या केली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शनिवारी सकाळी रेल्वे ट्रकमनला रेल्वे ट्रकवर छिन्नविच्छन अवस्थेत मृतदेह आढळून आला.याबाबतीत वैभववाडी पोलिसांना माहिती दिली.वैभववाडी पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.
वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यासाठी डाॕक्टर उपलब्ध होऊ शकले नाही.त्यामुळे दुपारी २ वा.पर्यंत नातावाईकांना ताटकळत राहावे लागले .अखेर फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॕक्टरांना बोलावून शवविच्छेदन करावे लागले.
त्याच्या पश्चात वयोवृध्द आई वडील तीन विवाहित बहीणी असा परिवार आहे.

26

4