आंबोलीतील उद्याचा रविवार सुना-सुना…

267
2

धबधबे प्रवाहीत झाले नाहीत; पर्यटकांचा हीरमोड होण्याची शक्यता…

आंबोली ता.१५ : वर्षा पर्यटनाची चाहूल लागली असली तरी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या येथील मुख्‍य धबधब्‍यासह इतर लहान-मोठे धबधबे अद्याप प्रवाहित झाले नाहीत.त्यामुळे उद्याच्या रविवारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
येथील धबधबे हे पर्यटकांसाठी वर्षा पर्यटनाचे मुख्य आकर्षण असते.तर पावसाळ्यात दरवर्षी याठिकाणी  हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात.येथील मुख्य धबधब्याजवळ रविवारी व सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.त्यामुळे या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो.मात्र धबधबे प्रवाहित न झाल्यामुळे अद्याप पोलीस बंदोबस्ता संदर्भात कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
4