धारगळ येथे दोन कार आदळून तीघे ठार एक जखमी…

491
2

अपघातानंतर लोकांनी गाडी जाळली : तीन तास घातला पोलिसांना घेराव…

पणजी, ता. १६ : धारगळ येथील चोपडे पुलावर स्विफ्ट आणि फाॅरच्युनर कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोरजी येथील तीघे ठार झाले. यात आई-वडीलांसह एका मुलाचा समावेश आहे.
हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान फॉर्च्युनर चालक हा ड्रग्स घेऊन गाडी चालत होता. त्यांच्यासोबत आणखी चार जण होते. त्यामुळे त्यांना अटक केल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा त्याठिकाणी असलेल्या जमावाने दिला. धडक देणारी गाडी महाराष्ट्र पासिंगची आहे. तो ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाला, असा आरोप करीत लोकांनी ती गाडी पेटवून दिली.
संबधित गाडीवर एका राजकीय पक्षाचा लोगो आहे. त्यामुळे संबंधित पक्ष त्या संशयितांना पाठीशी घालत आहे,  असा आरोप यावेळी करण्यात आला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान घटनास्थळी दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे तर आक्रमक नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरत या अपघाताला जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली.  जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा दिला. त्यातील चालक ड्रग्स घेऊन गाडी चालवत असल्याचा आरोप यावेळी केला.
4