सावंतवाडीत शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना मानवंदना

156
2
सावंतवाडी, ता. १६: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील शिवभक्तांकडून मानवंदना देण्यात आली. येथील जिल्हा परिषद शाळा नं ४ जवळील शिवतीर्थाजवळ जमून मानवंदना देण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शुभम घावरे, सुमित नलावडे, कृष्णा धुळपनावर, एकनाथ जाधव, आबा परब, प्रथमेश गावडे, विष्णु  वेंगुर्लेकर, स्वप्नील यादव, यल्लाप्पा रामजी, आकाश खिल्लारे आदी उपस्थित होते.
4