मनसेकडून सावंतवाडीत युवा उद्योजकांचा गौरव 

2
सावंतवाडी, ता. १६ : ऐन तारूण्यात समाजात यशस्वी युवा उद्योजक म्हणून ओळख करणाऱ्या सावंतवाडी शहरातील व्यवसायिकांचा आज सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने “युवा उद्योजक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
यावेळी या नवयुवकांचा उद्योग दिवसेंदिवस बहरावा यासाठी नवनवीन संकल्पना राबवा आणि भविष्यात यशस्वी व्हा असा सल्ला उपस्थित मान्यवरांनी दिला. मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने सन्मान मराठी युवा उद्योजकांचा हा कार्यक्रम येथील मालवणी गेस्ट हाउसमध्ये पार पडला. यावेळी मनसेचे कोकण प्रांताचे सरचिटणीस परशुराम उपरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, निवृत्त मुख्यमंत्र्यांचे माहिती अधिकारी सतीश पाटणकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा केसरकर, जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, संपर्क अध्यक्ष शैलेश शृंगारे, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, राजू कासकर, अनिल केसरकर, अतुल केसरकर, ओंकार कुडतरकर, ललिता नाईक, गीता माठेकर, शुभम घावरे, संकेत मयेकर, संकेत शेटकर, आबा परब, शिवराम बहिरे, प्रकाश साटेलकर आदी उपस्थित होते.
    यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमोद नारकर, प्रसाद बोवलेकर, सोनू देसाई, शिवाजी जाधव, प्रसाद दळवी, सायली राणे, सौरभ सातोसकर, सर्फराज दुर्वेश, सौरभ आईर आदी युवा उद्योजकांचा गौरव करण्यात आला.
4