पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकाकडे निवेदन
सावंतवाडी, ता. १६ : कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झालेली दैना लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी लक्षात घेऊन वसई ते सावंतवाडी पॅसेंजर गाडी नव्याने सुरू करण्यात यावे. नियमित गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकाकडे केली आहे.
या निवेदनात कोकण रेल्वेच्या माध्यमातून सावंतवाडी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागतो. अनेक गाड्यामध्ये डब्यांची संख्या कमी असल्यामुळे जनावरासारखा प्रवास करण्याची वेळ येते. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी तसेच वसई ते सावंतवाडी ही गाडी नव्याने सुरू करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात गावित यांनी केली आहे.