सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कामकाज सर्वजण मिळून “टीम वर्क” म्हणून करूया…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मनीष दळवी; वेंगुर्ले शाखेला दिली पहिली भेट, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सत्कार…

वेंगुर्ले ता.१४: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कामकाज सर्वजण मिळून “टीम वर्क” म्हणून करूया, बँकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला समाधान वाटेल, अशी अजून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करूया, बँकेच्या प्रत्येक कामात मी तुमच्या बरोबर आहे. कोणतीही अडचण असल्यास तुम्ही मला थेट संपर्क करा, जिल्हा बँकेच्या उज्वल यशाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे समजूनच काम करूया, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निर्मितीनंतर प्रथमच या बँकेच्या अध्यक्षपदाचा मान वेंगुर्ले तालुक्याला मनीष दळवी यांच्या मार्फत मिळाला आहे. त्यामुळे दळवी यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक काल पूर्ण झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी अध्यक्ष दळवी यांनी वेंगुर्ले येथील बँकेच्या शाखेला भेट दिली. यावेळी बँकेच्या वतीने त्यांचे स्वागत करून बँकेचे शाखा व्यवस्थापक श्यामसुंदर मेस्त्री यांच्या हस्ते त्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे विकास अधिकारी दत्तात्रय प्रभूआजगावकर, बागेश बागायतकर, शिरोडा शाखा व्यवस्थापक नंदू रेडकर, वेतोरे शाखा व्यवस्थापक संजय बागायतकर, मठ शाखा व्यवस्थापक विश्वनाथ वजराटकर, अधिकारी नंदकुमार बागलकर, कुडाळ शहर शाखा व्यवस्थापक सुनील फणसेकर, विकास अधिकारी आनंद प्रभू तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, परबवाडा सरपंच पप्पू परब, मनवेल फर्नांडिस, सायमन अल्मेडा, होडावडा सोसायटीचे राजबा सावंत तसेच पेन्शनर्स बाबी सातार्डेकर गुरुजी, सरताज शेख, गुरु वराडकर, राजन चिंचकर, प्रणील कोरगावकर, प्रवीण सावंत यांच्यासह बँकेतील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान अध्यक्ष मनीष दळवी यांनी होडावडा येथील बँकेच्या शाखेला भेट दिली. यावेळी बँकेतील अधिकारी सुनील जाधव, आर्ची कांबळी, राघवी डिचोलकर, प्रीतम ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.

\