सावंतवाडी मनसेच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त गरजूंना धान्याचे वाटप…

2

सावंतवाडी,ता.१४: येथील मनसेच्या वतीने आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून जिमखाना परिसरात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना गोड पदार्थ व धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त कुटुंबांना सेवेचा लाभ देण्यात आला.

यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड. राजू कासकर, मनसे कार्याध्यक्ष संतोष भैरव, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, शहराध्यक्ष आशीष सुभेदार, उपशहराध्यक्ष शुभम सावंत आदी उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी लाभार्थ्यांनी मनसेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

189

4