वेंगुर्लेतील नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली…

130
2
वेंगुर्ले ता.१६;नारायण तलाव भ्रष्टाचार संदर्भात महाराष्ट्राच्या लोकायुक्तांनी आयोजित केलेली १४ जून रोजी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून सदरची सुनावणी २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मुंबई कार्यालयात ठेवण्यात आली असल्याचे पत्र वेंगुर्ले नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांना प्राप्त झाले आहे.
       वेंगुर्लेतील नारायण तलाव भ्रष्टाचारा संदर्भात महाराष्ट्राच्या लोकायुक्तांनी १४ जून रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र, सदरची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. दि. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता उपलोकायुक्त यांच्यासमोर त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात ही सुनावणी होणार आहे. अशाप्रकारचे पत्र लोकआयुक्त आणि उपयलोकआयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून वेंगुर्ले नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांना प्राप्त झाले आहे. या सुनावणीसाठी अतुल हुले यांच्यासोबत मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांनाही बोलविण्यात आले आहे.
4