पालकमंत्री उदय सामंत यांचा १६ जानेवारीला सिंधुदुर्ग दौरा…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार १६ जानेवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार १६ जानेवारीला सकाळी ८ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता शिवसेना शाखा वैभववाडी येथे आगमन व वाभवे- वैभववाडी नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यासमवेत बैठक. सकाळी ११ वाजता वैभववाडी येथून मोटारीने कुडाळ जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता कुडाळ शहर येथे मा.आ.श्री. वैभव नाईक यांचेसमवेत कुडाळ नगरपंचायत- प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी २ वाजता राखीव. दुपारी २.३० वाजता कुडाळ येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता देवगड येथे आगमन व देवगड –जामसंडे मळई नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. सायंकाळी ५ वाजता देवगड येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. (देवगड-पावस सागरी मार्ग).

240

4