सावंतवाडी शहरात हॉकी व खो-खो मैदानासह क्रीडा संकुल उभारणार…

2

दीपक केसरकर; शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा…

सावंतवाडी,ता.१४: शहरात खेळाडूंसाठी दोन क्रीडा मैदाने होणार आहेत. खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र होईल. तसेच यामध्ये हाॅकी,खो-खो खेळाडू मैदानही दृष्टीक्षेपात आहे.तालुका क्रीडा संकुलासाठी साडेपाच कोटी मंजूर आहेत,अशी माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.दरम्यान शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
सावंतवाडी शहरात तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्याच्या आराखड्याच्या नियोजनासाठी आज माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सावंतवाडी शहरात खेळाडूंसाठी दोन मैदाने होणार आहेत त्याबाबत नियोजन करण्यात आले.तसेच सावंतवाडी शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून मीळणार आहे. त्याबाबत नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत तालुका क्रीडा संकुल, शहराच्या विकासासाठी २५ कोटी निधीतून घेण्यात येणारी कामे तसेच सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा नियोजन आणि हॉकी खो-खो खेळाडू मैदान बद्दल आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे,बांधकाम उपअभियंता अनिल आवटी तसेच जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका क्रीडा संकुल मंजूर आहे हे जिमखाना मैदान या ठिकाणी होणार आहे. तसेच तहसीलदार कार्यालयाच्या शेजारील भूसंपादन करण्यात आलेल्या जागेत हॉकी खो-खो चे खेळाडू मैदान होणार आहे, असे आमदार केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरात तालुका क्रीडा संकुल आणि हाॅकी, खो-खो खेळाडू मैदान अशी दोन मैदाने होणार आहेत. या संदर्भात आढावा बैठक झाली. येत्या सोमवार दि.१७ जानेवारी रोजी कोल्हापूर येथील आर्किटेक्चर या तालुका क्रीडा संकुलाच्या आराखडे बनवण्यासाठी भेट देणार आहेत तसेच स्टॅम्पड्युटी साठी देखील निधीला मान्यता देण्यात आली.
शहरांमध्ये खेळाची दोन मैदाने होणार आहेत नगराध्यक्ष असताना आपण ४०० मीटर रनिंग ट्रॅक तयार केला आहे, असे आमदार केसरकर यांनी सांगितले. तसेच तालुका क्रीडा संकुलच्या पार्श्वभूमीवर नवीन इमारत देखील होणार आहे या इमारतीत तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र होणार आहे. यासाठी साडे पाच कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर आहे. तसेच तहसीलदार कार्यालय शेजारील जागेत हॉकी खो-खो खेळाडू मैदान तर जिमखाना मैदानावर तालुका क्रीडा संकुल च्या माध्यमातून प्रशिक्षण सुविधा केंद्र आधी होईल असे आमदार केसरकर म्हणाले, याचे आराखडे तयार करण्यात येणार आहेत असेदेखील त्यांनी सांगितले.
राज्याच्या नगरविकास खात्याकडून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधीसाठी पाठपुरावा करत आहे. त्यामुळे विविध कामांचे नियोजन करण्यात यावे याबाबत मुख्याधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत देखील सर्वेक्षण करण्यासाठी निर्देश देण्यात आले. शहराच्या पाणीपुरवठा योजनेची पुनर्र पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी ४५ कोटींचा आराखडा तयार आहे त्यासाठी नगरपरिषदेने साडेचार कोटी रुपये भरणे आवश्यक आहे याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या पूर्वी जीवन प्राधिकरणाच्या वॉटर प्रकल्पातून एक केंद्र मंजूर आहे त्याबाबत चर्चा झाली असे आमदार केसरकर म्हणाले.

212

4