राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील गरीब कुटुंबाना अन्नधान्य वाटप…

173
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी 16; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात विविध ठिकाणी गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
वैभववाडी तालुका मनसेच्यावतीने करूळ भट्टीवाडी येथील श्री. विजय शिवराम केगडे तसेच करूळ खडकवाडी येथील श्री. मारूती रामचंद्र कदम, कोकिसरे बांधवाडी येथील श्री. सिताराम हरी आम्रसकर व श्री. सिताराम विठू दिवाळे या गरीब कुटुंबांना तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी उपतालुकाध्यक्ष दिपक पार्टे, विभाग अध्यक्ष मधुकर खाडये, विनोद विठेकर, सचिव महेश कदम, मनविसे तालुकाध्यक्ष रूपेश वारंग, संजय नारकर, सुर्यकांत मनगेकर, सुरेश गवाणकर, विकास गजोबार, दिपक आम्रसकर, यशवंत गवाणकर, संतोष विठेकर, सुरेश गवाणकर, प्रकाश फुटक, गणेश फुटक, विनोद गांधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

\