सावंतवाडीत ‘द सेव्हिअर’ आणि तालुका युवा मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण

2

नरेंद्र डोंगर परीसर : जांभूळ, गुलमोहर, काजू झाडे लावली

सावंतवाडी, ता. १६ : वटपौर्णिमेच्या निमित्ताने येथील द सेव्हिअर सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी तालुका युवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र डोंगर परीसरात बीजारोपण आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जांभूळ, गुलमोहर, काजू यासारखी विविध झाडे लावण्यात आली. जमिनीची होणारी धूप आणि वाढत्या वृक्षतोडिचा उपद्रव होत आहे. त्याचप्रमाणे जंगलतोड झाल्यामुळे प्राण्यांना खाद्य मिळत नसल्याने हे प्राणी वस्तीच्या ठिकाणी येत आहेत. त्यासाठी आम्ही परीसरात अननस लागवड करणार आहोत. याचाच भाग म्हणून आम्ही १५ आणि १६ जुनला सर्वांनी मिळून स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण असे दोन छोटेसे उपक्रम केले. यानंतर असे बरेच उपक्रम सावंतवाडी तालुकाच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्याचा मानस आम्ही केला आहे. तरी या सर्व संकल्पनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आणि युवकांनी सहकार्य करायला हवे आणि जमेल तेवढा वेळ सामाजिक कार्यास तसेच पर्यावरणावर देण्याची काळची गरज आहे. या संपूर्ण मोहिमेत चिन्मयी नाईक, प्रणिता कोटकर, सागर नाणोसकर, अजित सावंत, रोहित निर्गृण, ओंकार सावंत, सोमेश्वर सावंत, सौ. सारीखा पुनाळेकर, अखिलेश कानसेन, मुन्ना आजगावकर, विनय वाडकर, आशिष नाईक, चंचल धाऊसकर, आदित्य निर्गुण, तन्मय धोपेश्वर, सचिन मोरजकर, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे,अंकुश आजगावकर, वैभव धाऊसकर, गणेश धाऊसकर, दिपेश धाऊसकर, अंकित धाऊसकर, श्री. संजय गावडे या सर्वानी अथक मेहनत आणि परीश्रम घेतले.

4

4