मदरसा तालिमुद्दीन संघटनेची मागणी : पोलिस निरीक्षकांना निवेदन
कणकवली, ता. १६ : तालुक्यातील हरकुळ बुद्रूक येथे अफजल सुलतान शेख या तरुणाची निघ्रुण हत्या झाली. या प्रकरणातील मारेकरांना जास्तीत जास्त शिक्षा द्या अशी मागणी हरकुळ बुद्रूक येथील मदरसा तालिमुद्दीन संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज केली. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलिस निरीक्षकांना सादर केले. हरकुळ बुद्रूक येथे 10 जून रोजी रात्री अफजल शेख याचा खून झाला होता. या प्रकरणी मुझफ्फर पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याअनुषंगाने आज मदरसा तालिमुद्दीन संघटनेचे सईद नाईक, समद शेख, बडेमियाँ शेख, इमरान शेख, बाबूल पटेल, सरफराज शेख, शानू शहा, बशीर शेख, निसार शेख आणि आमद शेख आदींनी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांची भेट घेतली आणि अफजलच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा द्या या मागणीचे निवेदन त्यांना दिले.