अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

2

सिंधुदुर्गनगरी, ता. १७ :  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. दु. १ ते ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद गेटवर छेडण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त महासचिव रावजी यादव, परिचर संघटना अध्यक्ष मनीषा परब, सचिव अर्चना महाले, जिल्हा संघटक शीतल सावंत यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते. ७ व्या वेतन आयोगाची फरक रक्कम मिळावी. जिल्हा परिषद भरतीत १० टक्के आरक्षण मिळावे. अस्तित्वात नसलेल्या गॅझेटद्वारे रावजी यादव यांच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करावी. खोटया संघटनेकडून १० लाख रुपये शासन महसूल जमा करावा. चुकीच्या आरक्षणावर करण्यात आलेली भरतीची चौकशी करावी. रावजी यादव यांचा सेवानिवृत्त गटविमा मंजूर करावा. नंदादीप जाधव यांना नोकरीत सामावून घ्यावे. अंशकालीन स्त्री परिचर रिक्त पदे भरावीत. त्यांना रजा मंजूर करावी, या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

22

4