‘ईव्हीएम हटाव,लोकशाही बचाव’बॅलेट पेपरनेच यापुढे निवडणूका घ्या

2

वंचित बहुजन विकास आघाडीचे घंटानाद

सिंधुदुर्गनगरी 17;‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’ अशा घोषणा देत भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. राज्यभर हे आंदोलन छेडण्यात आले असून यापुढे निवडणूक ईव्हीएमद्वारे नको, अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवडणूक आयोगासाठी निवेदन देत बॅलेट पेपरनेच निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी भारिप जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी, आंदोलनाची पाश्वभूमी समजावून सांगत ईव्हीएम मशीनमुळे देशात कसा घोळ झाला ? याची माहिती दिली. प्रकाश आंबेडकर यांनी, हा घोळ पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सनदशीर आंदोलन राज्यभर सुरु करण्यात आले आहे. याची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी महासचिव प्रमोद कासले, महिला आघाडी प्रमुख भावना कदम, युवक आघाडी प्रमुख तेजस पडवळ, उपाध्यक्षा फिलोमीना फर्नांडिस, प्रसिद्धी प्रमुख मोहन जाधव, प्रभाकर साळसकर, अंकुश जाधव, यशवंत कदम, भगवान जाधव, पी डी कदम, बाबा सोनवडेकर, रमेश कदम, संतोष तांबे, गुणाजी जाधव, बाळा जाधव, गजानन जाधव, सुधीर अणावकर, अभिषेक कदम, सागर ओंबळकर, दीपक नाईक, रामा गोवरेकर, संदेश दिकवलकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. घ्या

1

4