सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने शाळेत येणाऱ्या नवागतांचे स्वागत

2

सावंतवाडी ता.१७: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवागतांचे स्वागत आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळेत करण्यात आले.यावेळी मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते.येथील कुणकेरी शाळा नंबर १ मध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या माध्यमातून मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तर शाळेत प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम,शिक्षिका नीता सावंत आदीसह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्षमी यांच्यासह ड. हरिश जगताप,गौतम जगदाळे,राजेंद्र पराडकर,कमलाकर रणदिवे,विनीत म्हात्रे,एकनाथ आंबोकर,अशोक खडूस,अनिल तिजारे,सुनील काळे,महेश खलीये,श्रीपाद पाताडे,वासुदेव नाईक आदी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाम मध्ये येणारे नवागतांचे स्वागत केले.

6

4